अशीच एक दुपार
त्या दिवशीची दुपारतशी . नेहमीसारखी शाळेतून परत आले . जेवले म्हणजे अम्ही जेवलो. हे आणि मी . इन मीन दोन डोकी . आता नाही म्हणायाला कामवाल्य आजीबाईना वाढते . पण तेवढेच . आवराआवर केली .
मग लोकसत्ता आणि टाईम्स मधली कात्रणं कापत बसले . खरतर पेपर तपासायचे होते .टाइमटेबलंवर नजर टाकायची होती . पण जे काम करायलाच हव त्याचा आपल्याला नेहमीच कंटाळा ना ! मधेच बघते तो काय पाऊस लागला होता . आकाश झाकळून गेले होते . गरमागरम कॉफी केली ह्याना दिली आणि वाफ़ाळलेला कप घेऊन मागच्या बाल्कनित गेले . पावसाचा जोर कमी होता . पण सतत पडत होता. काळोखी होतीच . सरळसोट निर्विकार पणे पाऊस पडतच होता. समोर काळ्या झालेल्या इमारती . भिजत होत्या ं. तसच नवीन वोटरप्रुफ़ इमारतींनाही पाऊस सोडत नव्हता. मागच्या बाजूला एक छोटासा टुमदार दुमजली बंगला होता. त्याचा रंगही पावसात धुऊन निघाल्यामुळे तुकतुकीत दिसत होता . आमच्या सोसायटीतली केळ , तगर, अशोक पावसांत नहात होते. नारळीची हिरवी पिवळी झावळ अंगावर पाऊस झेलत होती . आणि आतल्या बाजूचे केशरी पिवळे नारळ त्या छत्त्रीखाली पावसाची मजा अनुभवत होते.
सहज माझे लक्ष बंगल्याच्या खिडकीवर बसलेल्या कबुतराकडे गेली . सतत एकसुरी पडणाऱ्या पावसात ते जणु ध्यानस्त बसले होते. नजर वर सरकली आणि केबलच्या तारेवर बसलेल्या एका पक्षावर स्थिरावली . वर ढगांनी भरलेले आकाश ! करड्या रंगाचा तो पक्षी . तो तसा दूर होता. त्यामुळे कावळा चिमणी ,कबुतर का आणि कोण ते कळण्यास मार्ग नव्हता. पण तो नक्कीच ध्यानस्थ आत्मा होता. पाउस त्याच्या अंगावर कोसळत होता. पण त्याने जराही हालचाल केली नाही . पंख ही झटकले नाहीत जणू ह्या चाराचराशी तो तादात्म्य पावला होता .
आणि सहज विचार आला पक्षासारखा पक्षी --अगदी नगण्य आणि आम्ही माणस …. निसर्गावर मात केली म्हणतो…. पण ती खरच मात आहे ? अशा सुंदर पावसात आपापल्या खुराड्यात बसलो आहोत. चार भिंतीत . खरच किती अभागी आम्ही .
नकळत मी बाल्कनीच्या दोन्ही खिडक्या पूर्ण उघडल्या . वाफाळलेल्या कॉफीत पावसाचे तुषार पडत होते . त्याची तमा न करता ओणावले आणि पावसाचे थेंब टप टप , मोत्याप्रमाणे ,माझ्या चेहऱ्यावरून ओघळले क़ितॆ वेळ कोण जाणे . ओली मंद हवा, ते वातावरण दीर्घ श्वास घेऊन देहात जिरवल आणि अचानक तंद्री भंगली .थंड झालेला कॉफीचा कप गरम करण्यासाठी माझ्या खुराड्यात परत वळले.
------------------------------------------------------------------------------------------------------------